Bible Language

Amos 3:12 (LXXEN) English version of the Septuagint Bible

Versions

MRV   परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”
ERVMR   परमेश्वर म्हणतो, “जर सिंहाने मेंढीवर हल्ला केला, तर कदाचित मेंढपाळ तिला वाचवायचा प्रयत्न करील. पण तो मेंढीचा काही भागच वाचवू शकेल. तो कदाचित् मेंढीचे दोन पाय वा कानाचा तुकडाच सिंहाच्या तोंडातून ओढून काढेल. त्याचप्रकारे इस्राएलमधील बहुतांश लोक वाचणार नाहीत. शोमरोनमध्ये राहणारे लोक शय्येचा एखादा कोपरा किंवा बिछान्याच्या कापडाचा तुकडाच फक्त वाचवू शकतील.”
IRVMR   परमेश्वर असे म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून
फक्त दोन पाय,
किंवा कानाचा तुकडा वाचवितो * जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून फक्त दोन पाय, किंवा कानाचा तुकडा वाचवितो जेव्हा कळपातील प्राण्यांना वन्य प्राण्यांद्वारे मारले जात असे, तेव्हा त्या प्राण्याचे राहिलेले अवशेष, तो प्राणी कसा मेला, हे त्याच्या मालकाला दाखवण्यासाठी परत आणणे हे मेंढपाळाचे कर्तव्य होते. जर का तसे करण्यास तो मेंढपाळ असमर्थ ठरला तर त्याला त्या प्राण्यासाठी त्याच्या मालकाला पैसे द्यावे लागत असे. ,
त्याचप्रकारे इस्राएली लोक जे शोमरोनामध्ये पलंगाच्या कोपऱ्यात किंवा
खाटेच्या रेशमी गाद्यांवर बसतात ती वाचवली जातील.”