Bible Versions
Bible Books

Numbers 7:12 (ERVEN) Easy to Read - English

Versions

MRV   बारा प्रमुखापैकी प्रत्येकाने ह्याप्रमाणे अर्पणे आणिली; प्रत्येक प्रमुखाने पवित्रस्थानाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल वजनाचे चांदीचे एक ताट सत्तर शेकेल वजनाचा चांदीचा एक कटोरा आणिला. ती दोन्ही धान्यार्पणाकरिता उपयोगी असलेल्या, तेलात मळलेल्या मैद्याच्या पिठाने भरलेली होती. तसेच प्रत्येकाने धुपाने भरलेले दहा शेकेल वजनाचे एक मोठे सोन्याचे धूपपात्र आणिले. प्रत्येक प्रमुखाने एक गोऱ्हा, एक मेंढा, एक वर्षाचे नर असलेले एक कोकरु ही होमार्पणासाठी, तसेच पापार्पणासाठी एक बकरा; शांत्यार्पणासाठी दोन बैल, पाच मेंढे, पाच बकरे आणि एक एक वर्षाची नर असलेली पाच कोंकरे आणिली. पहिल्या दिवशी यहुदा वंशाचा प्रमुख अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन ह्याने आपली अर्पणे आणिली.दुसऱ्या दिवशी इस्साखर वंशाचा सूवारचा मुलगा नथनेल ह्याने आपली अर्पणे आणिली.तिसऱ्या दिवशी जबुलून वंशाचा प्रमुख हेलोनाचा मुलगा अलीयाब ह्याने आपली अर्पणे आणिली.चौथ्या दिवशी रऊबेन वंशाचा प्रमुख शदेयुराचा मुलगा अलीसूर ह्याने आपली अर्पणे आणिली.पांचव्या दिवशी शिमोन वंशाचा प्रमुख सुरीशद्दैचा मुलगा शलुमियेल ह्याने आपली अर्पणे आणिली.सहाव्या दिवशी गाद वंशाचा प्रमुख दगुवेलाचा मुलगा एल्यासाप ह्याने आपली अर्पणे आणिली.सातव्या दिवशी एफ्राईम वंशाचा प्रमुख अम्मीहुदाचा मुलगा अलीशामा ह्याने आपली अर्पणे आणिली.आठव्या दिवशी मनश्शे वंशाचा प्रमुख पदाहसुराचा मुलगा गमलीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.नवव्या दिवशी बन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा मुलगा अबीदान ह्याने आपली अर्पणे आणिली.दहाव्या दिवशी दान वंशाचा प्रमुख अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर ह्याने आपली अर्पणे आणिली.अकराव्या दिवशी आशेर वंशाचा प्रमुख आक्रानाचा मुलगा पगीयेल ह्याने आपली अर्पणे आणिली.बाराव्या दिवशी नफताली वंशाचा प्रमुख एनानाचा मुलगा अहीरा ह्याने आपली अर्पणे आणिली.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us