Versions
MRV आमच्यावर जी संकटे आली त्याला आम्हीच कारणीभूत आहोत. आम्ही दुर्वर्तन केले आणि त्याची आम्हाला खंत आहे. पण, परमेश्वरा, आमच्या अपराधांच्या मानाने तू आम्हाला केलेले शासन कमीच आहे. आम्ही जे भयंकर गुन्हे केले त्यांची जबरदस्त शिक्षा आम्हाला व्हायला हवी होती. आणि तू तर आमच्यापैकी काही जणांना बंदिवासातूनही सोडवलेस.