Versions
MRV परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले. त्याच्या सामर्थ्याने त्याने पृथ्वी निर्माण केली. आपल्या सामर्थ्याच्या जोरावरच त्याने पृथ्वीवर आकाश पसरविले. पण तुम्ही तुमचा निर्माता, देव आणि त्याच्या सामर्थ्याला विसरता म्हणूनच तुम्हाला दुखविणाऱ्या आणि रागावलेल्या माणसाला तुम्ही नेहमी घाबरता. त्या लोकांनी तुमच्या नाशाचा कट केला, पण आता ते कोठे आहेत? ते सर्व गेले.