Versions
MRV नंतर योहान म्हणाला, “ख्रिस्त कोण होता हे मलाही माहीत नव्हते परंतु मी लोकांचा बाप्तिस्मा पाण्याने करावा म्हणून देवाने मला पाठविले. आणि देवाने मला सांगितले, “आत्मा खाली येऊन एका मनुष्यावर स्थिरावताना दिसेल, तोच मनुष्य पवित्र आत्म्यानेबाप्तिस्मा करील.” योहान म्हणाला, “हे होताना मी पाहिले आहे. स्वर्गातून पवीत्र आत्मा खाली उतरताना मी पाहिला. आत्मा कबुतरासारखा दिसत होता. आणि तो त्याच्यावर (येशूवर) येऊन स्थिरावला.