Versions
MRV शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकचा मुलगा येशूवा यांनी यरुशलेमच्या मंदिरात परतल्याच्या दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. इतर याजक, लेवी हे त्यांचे बांधव व बंदिवासातून यरुशलेमला परतलेले एकूण सर्वजण त्यांच्या बरोबरीने कामाला लागले. परमेश्वराचे मंदिर बांधण्याच्या कामावर लेवींना नेमले.