Versions
MRV पलिष्ट्यांचे अधिकारी तिच्याकडे जाऊन तिला म्हणाले, “शमशोनच्या अचाट शक्तीचे रहस्य काय ते आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तू ते त्याच्याकडून युक्तीने काढून घे. म्हणजे मग त्याला जेरबंद कसे करायचे ते पाहता येईल. त्याला कह्यात आणता येईल. एवढे केलेस तर आम्ही तुला प्रत्येकी अठ्ठावीस पौंड चांदी देऊ.”