Versions
MRV तेव्हा शमाया हा संदेष्टा रहबाम आणि वडीलधारी मंडळी यांच्याकडे आला. शिशकच्या धास्तीने ही सर्व वडीधारी मंडळी यरुशलेमला जमली होती. शमाया रहबामला आणि या सर्वांना म्हणाला, “परमेश्वराचे म्हणणे असे आहे ‘रहबाम, तू आणि यहूदाचे लोक यांनी माझा त्याग केला आहे. तुमचे आचरण माझ्या नियमांच्या विरुध्द आहे. तेव्हा मीही तुम्हाला सोडून शिशकच्या हाती दिले आहे.”