Versions
MRV देवा, तूच राष्ट्राच्या वाढीचे कारण होशील, तेथल्या लोकांना तू सुखी करशील ते लोक त्यांचा आनंद तुझ्याजवळ व्यक्त करतील. सुगीच्या काळातील आनंदासारखा हा आनंद असेल. जेव्हा लोक लढाईतील जिंकलेल्या गोष्टींचा वाटा घेतात तेव्हा होणाऱ्या आनंदाप्रमाणे हा आनंद असेल.