Versions
MRV “सर्व याजक लेवी - वंशाचे आहेत. पण जेव्हा इस्राएलचे लोक माझ्या विरोधात गेले, तेव्हा फक्त सादोकच्या घराण्यातील लोकांनी माझ्या पवित्र जागेची काळजी घेतली. म्हणून फक्त सादोकचे वंशजच मला अर्पण करण्याच्या वस्तू माझ्याकडे घेऊन येतील. बळी दिलेल्या प्राण्यांची चरबी व रक्त मला वाहण्यासाठी तेच फक्त माझ्यापुढे उभे राहतील.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, ह्या गोष्टी सांगितल्या.