Bible Versions
Bible Books

Jonah 4 (MRV) Marathi Old BSI Version

1 परमेश्वराने नगरी वाचविली, ह्याचा योनाला आनंद झाला नाही तर उलट तो रागावला.
2 2 योनाने परमेश्वराकडे तक्रार केली. तो म्हणाला, “हे असे होणार हे मला माहीतच होते! मी माझ्या देशात होतो. तू मला येथे येण्यास सांगितलेस. त्याच वेळी मला कळले की या पापी नगरीच्या लोकांना तू क्षमा करणार. म्हणून मी तार्शिशला पळून जायचे ठरविले. तू दयाळू परमेशवर आहेस. हे मला ठाऊक होते. तू दया दाखवितोस आणि लोकांना शिक्षा करण्याची तुझी इच्छा नसते हे मला माहीतच होते. तू दयेचा सागर आहेस, हे मी जाणून होतो. मला माहीत होते की हे लोक पापांपासून परावृत्त झाल्यास, त्यांचा नाश करण्याचा बेत तू बदलशील.
3 3 म्हणून आता मी, परमेशवरा. तुला मला ठार मारण्याची विनंती करतो. माझ्या दृष्टीने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
4 4 मग परमेशवर म्हणाला, मी त्या लोकांचा नाश केला नाही म्हणून तू असे रागावणे योग्य आहे असे तुला वाटते का?”
5 5 पण ह्या सर्व गोष्टींबद्दल अजूनही योनाच्या मनात राग होता म्हणून तो नगरीबाहेर निघून गेला. नगरीजवळच्या, पूर्वाेकडील एका ठिकाणी योना गेला तेथे त्याने स्वत:साठी निवारा तयार केला. मग तेथे तो सावलीत नगरीचे काय होते ह्याची वाट पाहात बसला.
6 6 परमेशवराने, योनाच्या डोक्यावर, झटपट एक भोवळ्याचा वेल वाढविलास त्यामुळे योनाला बसायला थंड जागा झाली . त्याला आणखी आराम मिळायला मदत झाली ह्या वेलामुळे योनाला खूप आनंद झाला.
7 7 दुसऱ्या दिवशी सकाळी वेलीचा काही भाग खाण्याकरिता परमेशवराने एक किडा पाठविला किड्याने वेल खायला सुरवात केली वेल मेला.
8 8 सूर्य डोक्यावर असताना, परमेशवराने गरम पूर्वेचा वारा निर्माण केला. त्याने मरणासाठी परमेशवराची विनवणी केली तो म्हणाला माझ्या मताने जगण्यापेक्षा मरणे बरे!”
9 9 पण परमेशवर त्याला म्हणाला हा वेल मेला म्हणून रागावणे तुला योग्य वाटते का?”योना उत्तरला, हो माझा राग अगदी बरोबर आहे मी रागाने मरुन जाण्याइतका रागावलो आहे.”
10 10 मग परमेशवर म्हणाला, “तू त्या वेलासाठी काहीही केले नाहीस. तू त्याला वाढविले नाहीस. तो एका रात्रीत वाढला दुसऱ्या दिवशी मेला आणि आता तुला त्या वेलाबद्दल वाईट वाटत आहे.
11 11 तू एका वेलासाठी अस्वस्थ होऊ शकतोस तर मग निनवेसारख्या मोठ्या नगरीसाठी मला वाईट वाटणे अगदी शक्य आहे त्या नगरीत 1,20,000 पेक्षा जास्त लोक खूप प्राणी आहेत. त्या लोकांना आपण चुकीचे वागत आहेत ह्याची जाणीव नव्हती.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×