Bible Versions
Bible Books

Ephesians 3 (MRV) Marathi Old BSI Version

1 या कारणासाठी मी, पौल तुम्हा विदेशी लोकांसाठी ख्रिस्त येशूचा कैदी आहे.
2 2 देवाची कृपा तुमच्यापर्यंत पोचविण्याची व्यास्था करण्याचे काम माइयावर सोपवल्याचे तुम्ही जाणता
3 3 आणि जशी मी अगोदर तुम्हांला थोडक्यात लिहिली होती ती देवाची गूढ योजना मला प्रकटीकरणाच्या द्वारे कळविण्यात आली.
4 4 जर तुम्ही ती वाचाल तर तुम्हांला माझ्या ख्रिस्ताच्या रहरयाविषयीचे पूर्ण ज्ञान होणे शक्य होईल.
5 5 मागील पिढ्यांमध्ये हे रहस्य मनुष्यांच्या पुत्रांना सांगण्यात आले नव्हते, जसे आता त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणान्यांना आत्म्याच्या द्वारे प्रकट करण्यात आले आहे.
6 6 हे रहस्य ते आहे की, सुवार्तेद्वारे विदेशी लोक हे यहूदी लोकांबरोबर सहवारसदार आहेत, ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि ख्रिस्त येशूमध्ये देवाने दिलेल्या अभिवचनामध्ये सहभागीदार आहेत.
7 7 देवाच्या प्रभावी कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
8 8 जरी मी देवाच्या सर्व लोकांमध्ये लहानातील लहान आहे तरी मला हे देवाच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता यहूदीतरांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,
9 9 आणि रहस्यमय योजना सर्व लोकांना कळविण्यास सांगितली, ज्या देवाने सर्व गोष्टी निर्माण केल्या, त्याच्याकडे काळाच्या सुरुवातीपासून ही रहस्यमय योजना देवामध्ये लपून अशी राहिली होती.
10 10 यासाठी की आता मंडळीद्धारे सत्ताधीश आणि आकाशातील शक्ती यांना देवाचे वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान व्हावे.
11 11 देवाच्या अनंतकाळच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभु येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.
12 12 त्या ख्रिस्तामध्ये आम्हांला देवाच्या समक्षतेत आमच्या ख्रिस्तावरील विश्वासामुळे धैर्य आणि पूर्ण विश्वास आहे.
13 13 म्हणून, मी प्रार्थितो की, तुमच्यासाठी मला होणाऱ्या वलेशामुळे तुम्ही माघार घेऊ नये. कारण हे वलेश आमचे गौरव आहेत.
14 14 या कारण्यासाठी ज्याच्यापासून स्वर्गातील आणि पृथ्वीवरील प्रत्येक घराण्याला नाव मिळाले आहे, त्या पित्यासमोर गुडघे टेकून प्रार्थना करतो.
15 15
16 16 मी प्रार्थना करतो की, त्याने आपल्या वैभवी संपत्तीप्रमाणे तुम्हांला त्याच्या आत्म्याच्या द्वारे पराक्रमाने तुमच्या अंतर्यामी बलवान होण्यास मान्यता द्यावी.
17 17 आणि विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या अंत:करणात राहावा. तुमची मुळे चांगली रुजलेली प्रीतित मुळावलेली असावी.
18 18 यासाठी की, सर्व संतांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे समजून घेण्यास तुम्हांला सामर्थ्यप्राप्त व्हावे.
19 19 आणि ख्रिस्ताची प्रीति जी ज्ञान्यांना मागे टाकते हे कळावे यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने भरावे.
20 20 आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आम्हांमध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागितल्यापेक्षा किंवा आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक कार्य करण्यास तो समर्य आहे,
21 21 त्याला मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्यासाठी सदासर्वकाळ गौरव असो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×