Bible Versions
Bible Books

Genesis 15 (MRV) Marathi Old BSI Version

1 या सर्व गोष्टी घडल्यावर अब्रामाला दृष्टांन्तात परमेश्वराचे वचन आले. देव म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको; मी तुझे रक्षण करीन आणि तुला आनंद होईल असे मी तुला मोठे प्रतिफळ देईन.”
2 2 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वर देवा, असे काहीही प्रतिफळ नाही की जेणे कडून मला आनंद होईल, कारण मला मुलगा नाही; म्हणून माझ्या मरणानंतर माझे सर्वकाही दिमिष्कातील माझा गुलाम, अलिएजर यालाच मिळेल.”
3 3 अब्राम पुढे म्हणाला, “तू मला मुलगा दिला नाहीस म्हणून माझ्या घरात जन्मलेला माझा गुलामच माझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
4 4 परमेश्वर अब्रामाशी बोलला, तो म्हणाला, “तुझे सर्वकाही त्या तुझ्या गुलामाला मिळणार नाही; तर तुला मुलगा होईलआणि तोच तुझ्या सगळ्या मालमत्तेचा वारस होईल.”
5 5 मग देवाने अब्रामाला रात्रीचे आकाश दाखविण्यासाठी बाहेर नेले. देव म्हणाला, “ह्या आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, तुला मोजता येणार नाहीत इतके ते आहेत; येथून पुढच्या काळात तुझी संततीही त्या ताऱ्यांइतकी अगणित होईल.”
6 6 अब्रामाने देवावर विश्वास ठेवला देवाने त्याची प्रामाणिकांता गणना केली प्रमाणिक जीवन जगण्यास योग्य असा त्याचा विश्वस होता.
7 7 देव अब्रामाला म्हणाला, “हा देश तुला वतन करुन देण्याकरिता खास्द्यांच्या ऊर नगरातून तुला आणणारा मीच परमेश्वर आहे.”
8 8 परंतु अब्राम म्हणाला, “परमेश्वरा, माझ्या स्वामी, हा देश कायमचा वतन करुन मला मिळेल, याची खात्री मला कशी यावी?”
9 9 देव अब्रामाला म्हणाला, “माझ्यासाठी तीन वर्षांची एक कालवड, तीन वर्षांची एक शेळी, तीन वर्षांचा एक एडका तसेच एक होला एक पारव्याचे पिल्लू आण.”
10 10 अब्रामाने तीं सर्व देवाकडे आणली अब्रामाने त्यांना चिरुन त्या प्रत्येकाचे दोन दोन अर्धे तुकडे केले; ते समोरा समोर ठेवले; पक्षी मात्र त्याने दोन अर्धे चिरले नाहीत;
11 11 मग कापलेल्या प्राण्यांचे मांस खाण्याकरिता हिंस्र पक्ष्यांनी उडून त्यावर झडप घातली; परंतु अब्रामाने त्यांना हाकलून लावले.
12 12 नंतर त्या दिवशी सूर्य मावळू लागला, तेव्हा अब्रामाला गाढ झोप लागली म्हणून तो झोपला; तो झोपेत असताना अती भयंकर अंधार त्याच्यावर पडला;
13 13 मग परमेश्वर अब्रामाला म्हणाला, “तुला या गोष्टी समजल्या पाहिजेत; तुझे वंशज परक्या देशात राहतील ते तेथे परके असतील, ते तेथे गुलाम होतील आणि 400 वर्षे त्यांचा छळ होईल, त्यांच्यावर जुलूम केला जाईल;
14 14 परंतु चारशे वर्षानंतर ज्याने त्यांना गुलाम बनवले त्या राष्ट्राला मी शिक्षा करीन, आणि मग आपल्या बरोबर पुष्कळ धन घेऊन ते त्या देशातून निघतील.
15 15 “तू स्वत: फार म्हातारा होऊन शांतीने मरण पावशील आणि तुझे पूर्वज जेथे पुरलेले आहेत तेथे तुला मूठमाती देतील.
16 16 मग चार पिढ्यानंतर तुझे लोक या देशात माघारे येतील. त्यावेळी ते येथे राहाणाऱ्या अमोरी लोकांचा पराभव करतील, अमोरी लोकांना शिक्षा करण्यासाठी मी तुझ्या लोकांचा उपयोग करीन. (हे काही काळानंतर घडेल कारण अमोरी लोकांचा दुष्टपणा अद्याप शिगेला पोहोंचला नाहीं.)”
17 17 सूर्य मावळल्यानंतर गडद अंधार पडला; मारलेल्या जनावरांच्या तेथेच पडलेल्या धडांच्या दोन दोन अर्ध्या तुकड्यांमधून धुराचा लोट आणि अग्नी निघून गेला.
18 18 म्हणून त्या दिवशी परमेश्वराने अब्रामाला वचन दिले त्याच्याशी करार केला. परमेश्वर म्हणाला, “मिसर देशाच्या नदी पासून फरात म्हणजे युफ्रेटीस या महानदीपर्यंतचा प्रदेश मी तुझ्या वंशजांना देतो;
19 19 केनी, कनिजी, कदमोनी,
20 20 हित्ती, परिजी, रफाईम,
21 21 अमोरी, कनानी, गिर्गाशी यबूसी या लोकांचा प्रदेश मी तुम्हाला देतो.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×