Versions
MRV लोक बाबेलमधून बाहेर धावत आहेत. ते त्या देशातून सुटका करुन घेत आहेत. ते सियोनला येत आहेत. परमेश्वराच्या कृत्याबद्दल ते प्रत्येकाला सांगत आहेत. बाबेलला योग्य अशी शिक्षा परमेश्वर करीत असल्याबद्दल ते सांगत आहेत. बाबेलने परमेश्वराचे मंदिर उद्ध्वस्त केले म्हणून आता परमेश्वर बाबेलचा नाश करीत आहे.