Bible Versions
Bible Books

:

1 यहूदाच्या मुलांची नावे अशी: पेरेस, हेस्रोन, कर्मी, हूर आणि शोबाल.
2 शोबालचा मुलगा राया: त्याचा मुलगा यहथ. यहथाची मुले अहूमय आणि लहद. सराथी लोक म्हणजे या दोघांचे वंशज होत.
3 इज्रेल, इश्मा इद्बाश ही एटामाची मुले. त्यांच्या बहिणीचे नाव हस्सलेलपोनी.
4 पनुएलाचा मुलगा गदोर आणि एजेरचा मुलगा हूशा ही हूरची मुले. हूर हा एफ्राथाचा मुलगा आणि एफ्राथा ही बेथलेहेमची संस्थापक होती.
5 अशूरचा मुलगा तकोवा. तकोवाला दोन बायका होत्या. हेला आणि नारा.
6 नाराला अहुज्जाम, हेफेर, तेमनी आणि अहष्टारी हे मुलगे झाले.
7 सेरथ, इसहार, एथ्रान आणि कोस हे हेलाचे मुलगे.
8 कोसने आनूब आणि सोबेबा यांना जन्म दिला. हारुमचा मुलगा अहरहेल याच्या घराण्यांचा प्रवर्तकही कोसच होता.
9 याबेस एक फार चांगला माणूस होता. आपल्या भावांपेक्षा तो भला होता. त्याची आई म्हणे, “याचे नाव याबेस ठेवले कारण याच्यावेळी मला असह्य प्रसववेदना झाल्या.”
10 याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
11 शूहाचा भाऊ कलूब. कलूबचा मुलगा महीर. महीरचा मुलगा एष्टोन.
12 बेथ-राफा, पासेहा आणि तहिन्ना ही एष्टोनची मुले. तहिन्नाचा मुलगा ईर-नाहाश. हे रेखा येथील लोक होत.
13 अथनिएल आणि सराया ही कनाजची मुले. हथथ आणि म्योनोथाय ही अथनिएलची मुले.
14 म्योनोथायने अफ्राला जन्म दिला. आणि सरायाने यवाबला जन्म दिला. यवाब हा गे-हराशीमचा संस्थापक. तेथील लोक कुशल कारागीर असल्यामुळे त्यांनी हे नाव घेतले.
15 यफुन्ने याचा मुलगा कालेब. कालेबची मुले म्हणजे इरु, एला आणि नाम. एलाचा मुलगा कनज.
16 जीफ, जीफा, तीऱ्या आणि असरेल हे यहल्ललेलचे मुलगे.
17 This verse may not be a part of this translation
18 This verse may not be a part of this translation
19 मरदची बायको ही नहमची बहीण होती. मरदची ही बायको यहूदाकडील होती. मरदच्या बायकोच्या मुलांनी कईला आणि एष्टमोवा यांना जन्म दिला. कईला गार्मी लोकांपैकी होता आणि एष्टमोवा माकाथी होता.
20 अम्नोन, रिन्ना, बेन - हानान, तिलोन हे शिमोनचे मुलगे. इशीचे मुलगे जोहेथ आणि बेन-जोहेथ.
21 This verse may not be a part of this translation
22 This verse may not be a part of this translation
23 शेलाचे वंशज हे कुंभार असून ते नेताईम आणि गदेरा येथे राजाच्या चाकरीत होते.
24 नमुवेल, यामीन, यारिब, जेरह, शौल हे शिमोनचे मुलगे.
25 शौलचा मुलगा शल्लूम. शल्लूमचा मुलगा मिबसाम. मिबसामचा मुलगा मिश्मा.
26 मिश्माचा मुलगा हम्मूएल. हम्मूएलचा मुलगा जक्कूर. जक्कूरचा मुलगा शिमी.
27 शिमीला सोळा मुलगे आणि सहा मुली होत्या. पण शिमीच्या भावांना फार मुले बाळे झाली नाहीत. त्यांची (कुदुंबे) मर्यादितच होती. यहूदातील इतर काही घराण्यांप्रमाणे त्यांचा विस्तार नव्हता.
28 शिमीच्या वंशजातील लोक बैर-शेबा, मोलादा हसर-शुवाल,
29 बिल्हा, असेम, तोलाद,
30 बथुवेल, हर्मा सिकलाग,
31 बेथमकर्ाबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी शाराइम येथे राहत होते. दावीदराजा होईपर्यंत त्यांची तेथे वस्ती होती.
32 एटाम, अईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान ही या पाच गावांची नावे.
33 बालापर्यंत पसरलेल्या खेड्यापाड्यांमधूनही ते राहत होते. आपल्या वंशावळींची नोंदही त्यांनीच ठेवली.
34 This verse may not be a part of this translation
35 This verse may not be a part of this translation
36 This verse may not be a part of this translation
37 This verse may not be a part of this translation
38 This verse may not be a part of this translation
39 ते खोऱ्याच्या पूर्वेला गदोरच्या सीमेबाहेरही जाऊन पोहोंचले. आपल्या गुरोमेंढरांना चरायला कुरण हवे म्हणून जमिनीच्या शोधात ते गेले.
40 त्यांना चांगली गवताळ कुरणे मिळाली. तेथील जमीन विस्तीर्ण होती. ही भूमी शांत स्वस्थ होती. हामचे वंशज पूर्वी या भागात राहत असत.
41 हिज्कीया यहूदाचा राजा होता त्यावेळची ही हकीकत. ते लोक गदोरपर्यंत आले आणि हामच्या लोकांशी त्यांनी लढाई केली. हामच्या लोकांच्या राहुट्या त्यांनी उद्ध्वस्त केल्या. तेथे राहणाऱ्या मूनी लोकांनाही त्यांनी ठार केले. आजही या भागात मूनीलोक आढळत नाहीत. तेव्हा या लोकांनी तेथे वस्ती केली. मेंढरांसाठी कुरण असल्याने ते तेथे राहिले.
42 शिमोनच्या घराण्यातील पाचशे माणसे सेईर डोंगरावर गेली. इशीचे मुलगे पलटया, नाऱ्या, रफाया आणि उज्जियेल यांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिमोनी लोकांनी त्या ठिकाणी वस्ती असणाऱ्या लोकांशी चकमकी केल्या.
43 काही अमालेकी लोकांचा त्यातूनही निभाव लागला ते तेवढे अजून आहेत. त्यांना शिमोन्यांनी ठार केले. तेव्हा पासून सेईरमध्ये अजूनही शिमोनी लोक राहत आहेत.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×