Bible Versions
Bible Books

1 Thessalonians 5 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 बंधूंनो, वेळ आणि तारीखवार मी तुम्हांला लिहिण्याची गरज नाही.
2 कारण तुम्ही स्वत:चे हे चांगल्या प्रकारे जाणता की, प्रभूच्या परत येण्याचा दिवस येईल. तो जणू काय रात्रीचा चोर जसा येतो तसा येईल.
3 जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात मग ते सूटू शकणार नाहीत!
4 परंतु बंधूनो, त्या दिवसाने चोराप्रमाणे अचानक येऊन आपल्याला गाठून आश्चर्यात टाकावे अशा प्रकारे आपण अंधारात नाही.
5 कारण तुम्ही सर्वजण प्रकाशाचे पुत्र आहात दिवसाचे पुत्र आहा, आम्ही अंधाराचे किंवा रात्रीचे नाही.
6 म्हणून आपण इतरांसारखे झोपू नये. उलट आपण सावध राहू आमच्या स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु.
7 कारण जे झोपातात ते रात्री झोपतात जे दारु पितात ते रात्री दारु पितात,
8 परंतु आपण दिवसाचे असल्याने स्व:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करु या. आपण विश्वास आणि प्रीतिचे छातीला उरस्त्राण घालू या. आणि आमचे शिरस्त्राण म्हणून तारणाची आशा ठेवू या.
9 This verse may not be a part of this translation
10 तो आमच्यासाठी मरण पावला यासाठी की, आम्ही मेलेले असू किंवा जिवंत असू, जेव्हा येशू येईल तेव्हा आम्हाला त्याबरोबर एकत्र राहता यावे.
11 म्हणून एकमेकांना उत्तेजन द्या. आणि जसे आता तुम्ही करीत आहात तसे आध्यात्मिक रीतीने एकमेकांना पूर्ण मनाने बळकट करा.
12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या.
13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या. एकमेकांबरोबर शांतीने राहा.
14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा.
15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
16 सर्वदा आनंद करा.
17 नेहमी प्रार्यना करीत राहा.
18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका.
20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका.
21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा.
22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
23 देव स्वत: जो शांतीचा उगम आहे. तो तुम्हांला त्याच्यासाठी पूर्णपणे समर्पित करो आणि तुमचे सर्व मनुष्याण म्हणजे तुमचा आत्मा, जीव आणि शरीर प्रभु येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळी पूर्णपणे निर्दोष राखो.
24 देव जो तुम्हाला बोलावितो तो विश्वासू आहे आणि खरोखरच तो तसे करील.
25 बंधूंनो, कृपा करुन आमच्यासाठीसुद्धा प्रार्थना करा.
26 पवित्र चुंबनाने सर्व बंधूंना सलाम करा.
27 मी तुम्हांला प्रभुची शपथ घ्यावयाला सांगतो की, हे पत्र सर्व बंधूना वाचून दाखविण्यात यावे.
28 आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×