Bible Versions
Bible Books

Joshua 19 (MRV) Marathi Old BSI Version

1 नंतर शिमोन वंशजांच्या सर्व कुळांतील लोकांना यहोशवाने जमिनीतील हिस्सा दिला. यहूदाच्या वाटणीची जमिनी मध्येच यांचाही वाटा होता.
2 2 तयांना मिळालेला भाग असा; बैरशेबा (म्हणजेच शेबा), मोलादा,
3 3 हसर-शुवाल, बाला, असेम,
4 4 एलतोलद, बधूल, हर्मा,
5 5 सिकलाग, बेथ-मकर्बोथ, हसर-सुसा
6 6 बेथ-लबवोथ, शारुहेन ही तेरा नगरे आसपासचा भाग.
7 7 अईन, रिम्मोन एतेर आशान ही चार नगरे भोवतालची गावेही त्यांना मिळाली.
8 8 तसेच बालथ-बैर (म्हणजेच नेगेवमधील रामा) येथपर्यंत या नगरांच्या चहूकडची गावेही त्यांना मिळाली शिमोनच्या वंशजांना मिळालेला हा भूभाग. प्रत्येक कुळाला त्यात वाटणी मिळाली.
9 9 शिमोनचा प्रदेश यहादाच्या वाटच्या जमिनीच्या अंतर्गतच होता. यहूदाच्या लोकांची जमीन त्यांच्या गरजेच्या मानाने खूपच जास्त होती. म्हणून शिमोनच्या लोकांना त्यातच हिस्सा दिला.
10 10 जबुलून हा आणखी एक वंश त्यांनाही कुळांप्रमाणे वाटा मिळाला. त्यांच्या जमिनीची हद्द सारीद पर्यंत होती.
11 11 ती पश्चिमेकडे वर मरल कडे जाऊन दब्बेशेथपर्यंत जेमतेम पोचली. मग यकनाम झऱ्याच्या बाजूबाजूने गेली.
12 12 तेथून पूर्वेला वळून सारीद पासून किसलोथ-ताबोर पर्यंत गेली. तेथून दाबरथ पुढे याफीय येथपर्यंत गेली.
13 13 त्यानंतर ती सीमा पूर्वेकडे गथ-हेफेर आणि इजा-कासीनकडे गेली. आणि ती रिम्मोन येथे थांबली त्यानंतर ती वळण घेऊन नेया कडे गेली.
14 14 नेया येथे वळसा घालून उत्तरेला हन्राथोनपर्यंत गेली तिचा शेवट इफता एलाच्या खिंडीपाशी झाला.
15 15 कट्टाथ, नहलाल, शुम्रोन इदला आणि बेथलहेम ही नगरे या हद्दीच्या आत येत होती. ती एकंदर बारा नगरे आसपासची खेडी होती.
16 16 जबुलूनच्या वाटणीची शहरे भोवतालचा प्रदेश तो हाच त्याच्या कुळातील सर्वांना यात वाटा मिळाला.
17 17 चौथा हिस्सा इस्साखाराच्या वंशजांना त्यांच्या कुळाप्रमाणे मिळाला.
18 18 त्याना मिळालेली जमीन या प्रमाणे: इज्रेल, कसुल्लोथ, शूनेम,
19 19 हफराईम, शियोन, अनाहराथ
20 20 रब्बीथ, किशोन, अबेस,
21 21 रेमेथ, एन-गन्नीम, एन-हद्दा आणि बेथ-पसेस.
22 22 त्यांच्या प्रदेशाची हद्द ताबोर, शहसुमा बेथ शेमेश यांना लागून होती. यार्देन नदीशी ती थांबत होती. सर्व मिळन सोळा नगरे त्यांच्या आसपासची खेडी एवढा त्यांचा भाग होता.
23 23 इस्साखाराच्या वंशजांना, त्यांच्यातील सर्व कुळांना मिळालेला हिस्सा तो हाच.
24 24 पाचवा हिस्सा आशेरच्या वंशजांना मिळाला. त्याच्यातील सर्व कुळांचे त्यात वाटे होते.
25 25 त्यांना मिळालेली जमीन ही; हेलकथ, हली, बटेन, अक्षाफ
26 26 अल्लामेलेख, अमाद, मिशाल पश्चिमेला त्यांची हद्द कर्मेल शिहोर-लिब्नाथ येथपर्यंत जाऊन
27 27 पुढे पूर्वेला वळली. बेथ दागोनकडे जाऊन जबुलूनला स्पर्श केला. आणि इफताह-एलच्या खोऱ्याला भिडली. नंतर बेथ एमेक आणि नियेल यांच्या उत्तरेला गेली काबूलच्या उत्तरेला गेली.
28 28 पुढे एब्रोन, रहोब, हम्मोन काना येथपर्यंत जाऊन मोठ्या सीदोन पर्यंत गेली.
29 29 मग दक्षिणेला रामा तिथून सोर नामक भक्क तटबंदीच्या नगराकडे वळली. तेथून होसकडे जाऊन तिचा शेवट अकजीब,
30 30 उम्मा अफेक रहोब यांच्या जवळ समुद्रानजीक झाला. नगरे भोवतालचा प्रदेश मिळून ही बावीस होतात.
31 31 हा भाग आशेरच्या वंशजांना त्यांच्या कुळांबरहुकूम मिळाला.
32 32 सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.
33 33 त्यांची सीमा साननीम जवळच्या विशालवृक्षा पासून सुरु होते. हा हेलेफच्या जवळ आहे. मग ही सीमा अदामी नेकेब यबनेल यांच्यामधून लक्क वरुन यार्देन नदीला भिडते.
34 34 मग पश्चिमेला अजरोथ ताबोर यांच्यातून हुक्कोकशी थांबते. दक्षिणेची हद्द जबुलूनला लागून आहे आणि पच्श्रिम हद्द आशेरला. पूर्वेला ही सीमा यार्देन नदीपासच्या यहुदापर्यंत आहे.
35 35 या हद्दीच्या आत काही मजबूत तटबंदीची शहरे आहेत. ती म्हणजे, सिद्दीम, सेर. हम्मथ, रक्कथ, किन्नेरेथ,
36 36 अदामा, राम, हासोर,
37 37 केदेश, एद्रई, एन-हासोर.
38 38 हरोन. मिग्दल-एल, हरेम, बेथ-अनाथ बेथ-शेमेस. ही शहरे त्याच्या आसपासचा भाग मिळून ही एकोणीस नगरे झाली.
39 39 नफतालीला त्यांच्या कुळांप्रमाणे ही सर्व शहरे भोवतालची खेडी मिळाली.
40 40 सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला.
41 41 त्यांना मिळालेला
42 42 शालब्बीन, अयालोन, इथला,
43 43 एलोन, तिम्ना, एक्रोन,
44 44 एलतके गिब्बथोन, बालाथ,
45 45 यहूद, बने-बराक, गथ रिम्मोन,
46 46 मीयकोन, रक्कोन आणि याफोच्चा समोरचा प्रदेश.
47 47 आपल्या वाटणीचा प्रदेश ताब्यात घ्यायला दानच्या वंशजांना त्रास झाला. त्यांच्या शत्रूचे सामर्थ्य अधिक होते. दानच्या लोकांना त्यांचा सहजासहजी पराभव करता आला नाही. तेव्हा दानच्या लोकांनी इस्राएलाच्या उत्तर भागाकडे जाऊन लेशेमशी त्यांनी लढाई केली. लढाईत लेशेमला हरवून त्यांचे लोक मारले. अशाप्रकारे दानचे लोक लेशेममध्ये राहू लागले. त्यांनी लेशेम हे नाव बदलून त्या शहराला आपल्या पूर्वजांचे दान हे नाव दिले,
48 48 ही सर्व शहरे भोवतालची खेडी दान वंशजांना मिळाली. त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाला हिस्सा मिळाला.
49 49 अशाप्रकारे जमिनीची विभागणी आणि सर्व वंशांच्या लोकांना करायच्या वाटण्या हे काम प्रमुखांनी पार पाडले. ते झाल्यावर नूनीचा पुत्र यहोशवाला ही काही जमीन द्यायचे इस्राएलाच्या लोकांनी ठरवले. तशी परमेश्वराची आज्ञा होती.
50 50 त्याला ही जमीन मिळावी अशी परमेश्वराने आज्ञा दिली होती. तेव्हा त्यानी एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील तिम्राथ-सेरह हे नगर यहोशवाला दिले. यहोशवाने ते नगर मागितले होते. तेव्हा ते नगर आणखी बळकट करुन तो तेथे राहू लागला.
51 51 अशाप्रकारे या जमिनीच्या वाटण्या इस्राएलच्या सर्व वंशांच्या लोकांमध्ये झाल्या. एलाजार हा याजक, नूनाचा पुत्र यहोशवा आणि वडील धारी मंडळी या कामासाठी शिलो येथे जमली होती. परमेश्वरासमोर सभामंडपाच्या प्रवेशद्धारात ते एकत्र जमले. अशाप्रकारे हे वाटपाचे काम समाप्त झाले.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×