|
|
1. ईयोबने बोलणे सुरु ठेवले तो म्हणाला:
|
1. Moreover H3254 Job H347 continued H5375 his parable H4912 , and said H559 ,
|
2. “काही महिन्यांपूर्वी देव जसा माझ्यावर लक्ष ठेवून होता आणि माझी काळजी घेत होता, तसेच माझे आयुष्य आताही असते तर किती बरे झाले असते.
|
2. Oh that H4310 I were H5414 as in months H3391 past H6924 , as in the days H3117 when God H433 preserved H8104 me;
|
3. तेव्हा देवाचा प्रकाश माझ्यावर प्रकाशत होता आणि मला अंधारातून चालताना प्रकाश दाखवत होता. तसेच आताही असायला हवे होते असे मला वाटते.
|
3. When his candle H5216 shined H1984 upon H5921 my head H7218 , and when by his light H216 I walked H1980 through darkness H2822 ;
|
4. मी जेव्हा यशस्वी होतो आणि देव माझा मित्र होता त्या दिवसांची मी आशा करतो. त्या दिवसात माझ्यावर देवाचे कृपाछत्र होते.
|
4. As H834 I was H1961 in the days H3117 of my youth H2779 , when the secret H5475 of God H433 was upon H5921 my tabernacle H168 ;
|
5. जेव्हा सर्वशक्तिमान देव माझ्याबरोबर होता आणि माझी मुले माझ्या जवळ होती त्या दिवसांची मी आशा धरतो.
|
5. When the Almighty H7706 was yet H5750 with H5978 me, when my children H5288 were about H5439 me;
|
6. त्या दिवसांत माझे आयुष्य अतिशय चांगले होते. मी माझे पाय मलईत धूत असे. माझ्याकडे उत्तम प्रकारची पुष्कळ तेले होती.
|
6. When I washed H7364 my steps H1978 with butter H2529 , and the rock H6697 poured me out H6694 H5978 rivers H6388 of oil H8081 ;
|
7. “त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
|
7. When I went out H3318 to the gate H8179 through H5921 the city H7176 , when I prepared H3559 my seat H4186 in the street H7339 !
|
8. सगळे लोक मला मान देत. मला येताना बघून तरुण माझ्या वाटेतून बाजूला होत आणि वृध्द उठून उभे राहात. मला आदर देण्यासाठी ते उठून उभे राहात असत.
|
8. The young men H5288 saw H7200 me , and hid themselves H2244 : and the aged H3453 arose H6965 , and stood up H5975 .
|
9. लोकप्रमुख बोलणे थांबवीत आणि इतरांना शांत राहाण्याची सूचना देण्यासाठी तोंडावर बोट ठेवीत.
|
9. The princes H8269 refrained H6113 talking H4405 , and laid H7760 their hand H3709 on their mouth H6310 .
|
10. महत्वाचे लोक सुध्दा बोलताना त्यांचा आवाज लहान करीत. होय, तेव्हा त्यांची जीभ टाळूला चिकटण्यासाखी वाटे.
|
10. The nobles H5057 held H2244 their peace H6963 , and their tongue H3956 cleaved H1692 to the roof of their mouth H2441 .
|
11. लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देत. आणि माझ्याबद्दल चांगले बोलत असत. मला भेटणारा प्रत्येकजण माझी स्तुती करी.
|
11. When H3588 the ear H241 heard H8085 me , then it blessed H833 me ; and when the eye H5869 saw H7200 me , it gave witness H5749 to me:
|
12. का? कारण जेव्हा एखादा गरीब मदतीची याचना करायचा तेव्हा मी त्याला मदत करीत असे आणि पोरक्या मुलाकडे लक्ष द्यायला कुणी नसले तर मी मदत करीत असे.
|
12. Because H3588 I delivered H4422 the poor H6041 that cried H7768 , and the fatherless H3490 , and him that had none H3808 to help H5826 him.
|
13. मृत्युपंथाला लागलेला माणूस मला आशीर्वाद देत असे. मी गरजू विधवांना मदत करीत असे.
|
13. The blessing H1293 of him that was ready to perish H6 came H935 upon H5921 me : and I caused the widow H490 's heart H3820 to sing for joy H7442 .
|
14. सत्याने जगणे म्हणजे जणू माझे वस्त्र होते. माझे योग्य वागणे म्हणजे माझा अंगरखा आणि डोक्यावरची पगडी होती.
|
14. I put on H3847 righteousness H6664 , and it clothed H3847 me : my judgment H4941 was as a robe H4598 and a diadem H6797 .
|
15. मी आंधळ्यांची दृष्टी होतो. त्यांना जिथे जायचे असेल तिथे मी नेत असे. मी अपंगांचे पाय होतो त्यांना हवे तिथे मी उचलून नेत असे.
|
15. I was H1961 eyes H5869 to the blind H5787 , and feet H7272 was I H589 to the lame H6455 .
|
16. गरीब लोकांना मी वडिलांसारखा वाटत असे. मला माहीत नसलेल्या लोकांनादेखील मी मदत करीत असे. मी कोर्टात न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना मदत करीत असे.
|
16. I H595 was a father H1 to the poor H34 : and the cause H7379 which I knew H3045 not H3808 I searched out H2713 .
|
17. मी दुष्ट लोकांचे सामर्थ्य नष्ट केले. मी निरपराध लोकांचा त्यांच्यापासून बचाव केला.
|
17. And I broke H7665 the jaws H4973 of the wicked H5767 , and plucked H7993 the spoil H2964 out of his teeth H4480 H8127 .
|
18. “मला नेहमी वाटायचे मी खूप वर्षे जगेन, मला स्वत:च्या घरातच मृत्यू येईल.
|
18. Then I said H559 , I shall die H1478 in H5973 my nest H7064 , and I shall multiply H7235 my days H3117 as the sand H2344 .
|
19. मी खूप पाणी शोषून घेऊ शकणारी मुळे असलेल्या व ज्याच्या फांद्या दवाने ओल्या झालेल्या आहेत अशा झाडासारखा असेन, असे मला वाटत असे.
|
19. My root H8328 was spread out H6605 by H413 the waters H4325 , and the dew H2919 lay all night H3885 upon my branch H7105 .
|
20. मला रोज नवतरुण झाल्यासारखे वाटत असे. रोज नवीन बाण सोडण्याइतकी शक्ती आपल्यात आहे असे मला वाटत असे.
|
20. My glory H3519 was fresh H2319 in H5978 me , and my bow H7198 was renewed H2498 in my hand H3027 .
|
21. “पूर्वी लोक माझे ऐकत असत माझ्या उपदेशाची वाट पाहात ते शांत बसत.
|
21. Unto me men gave ear H8085 , and waited H3176 , and kept silence H1826 at H3926 my counsel H6098 .
|
22. मी माझे बोलणे संपवल्यानंतर ऐकणाऱ्यांना आणखी काही बोलायचे नसे. माझे शब्द त्यांच्या कानावर हळूवारपणे पडत.
|
22. After H310 my words H1697 they spoke not again H8138 H3808 and my speech H4405 dropped H5197 upon H5921 them.
|
23. पावसाची वाट पाहिल्यासारखी ते माझ्या बोलण्याची वाट पाहात. वसंतातल्या पावसासारखे ते माझे शब्द पिऊन टाकत.
|
23. And they waited H3176 for me as for the rain H4306 ; and they opened H6473 their mouth H6310 wide as for the latter rain H4456 .
|
24. काही लोकांनी आशा सोडून दिली होती. त्यांचे धैर्य खचले होते. परंतु मी त्यांच्याबरोबर हसलो. माझ्या हास्याने त्याना बरे वाटले.
|
24. If I laughed H7832 on H413 them , they believed H539 it not H3808 ; and the light H216 of my countenance H6440 they cast not down H5307 H3808 .
|
25. मी त्यांचा प्रमुख असूनही त्यांच्याबरोबर राहाण्याचे ठरवले. आपल्या सैन्याबरोबर तळ ठोकून बसलेल्या राजासारखा दु:खी असलेल्यांचे सांत्वन करणाऱ्या राजासारखा मी होतो.
|
25. I chose out H977 their way H1870 , and sat H3427 chief H7218 , and dwelt H7931 as a king H4428 in the army H1416 , as H834 one that comforteth H5162 the mourners H57 .
|