|
|
1. परमेश्वर मोशेला म्हणाला,
|
1. And the LORD H3068 spoke H1696 unto H413 Moses H4872 , saying H559 ,
|
2. “चांदीचे दोन घडीव कर्णे बनव. लोकांना एकत्र जमविण्यासाठी आणि तळ कधी हलवावा हे सांगण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.
|
2. Make H6213 thee two H8147 trumpets H2689 of silver H3701 ; of a whole piece H4749 shalt thou make H6213 them : that thou mayest use H1961 them for the calling H4744 of the assembly H5712 , and for the journeying H4550 H853 of the camps H4264 .
|
3. तू जर दोन्ही कर्णे बराच वेळपर्यंत वाजविले तर मग सर्व लोकांनी दर्शन मंडपासमोरील अंगणात जमावे.
|
3. And when they shall blow H8628 with them, all H3605 the assembly H5712 shall assemble themselves H3259 to H413 thee at H413 the door H6607 of the tabernacle H168 of the congregation H4150 .
|
4. परंतु बराच वेळ एकच कर्णा वाजविला तर मग फकत इस्राएलांच्या बारा वंशाच्या प्रमुखांनीच तुला भेटावयास यावे.
|
4. And if H518 they blow H8628 but with one H259 trumpet , then the princes H5387 , which are heads H7218 of the thousands H505 of Israel H3478 , shall gather themselves H3259 unto H413 thee.
|
5. “कर्ण्यांचा थोडा गजर झाला म्हणजे लोकांनी आपला तळ हलवावा हे सांगण्याचा तो एक मार्ग होईल. पहिल्याच वेळी जेव्हा तू कर्ण्याचा थोडा गजर करशील तेव्हा दर्शनमंडपाच्या पूर्वेकडील छावण्यातील वंशानी पुढे चालण्यास सुरवात करावी.
|
5. When ye blow H8628 an alarm H8643 , then the camps H4264 that lie H2583 on the east parts H6924 shall go forward H5265 .
|
6. दुसऱ्या वेळी थोडाच वेळ तू कर्णा वाजवशील तेव्हा दक्षिणेकडील छावण्यातील वंशानी पुढे निघण्यास सुरवात करावी.
|
6. When ye blow H8628 an alarm H8643 the second time H8145 , then the camps H4264 that lie H2583 on the south side H8486 shall take their journey H5265 : they shall blow H8628 an alarm H8643 for their journeys H4550 .
|
7. परंतु विशेष कारणासाठी मंडळी एकत्र जमावावयाची असेल तर कर्णे वेगळ्या प्रकारे म्हणजे एकाच सरळ सारख्याच सुरात वाजवावेत.
|
7. But when H853 the congregation H6951 is to be gathered together H6950 , ye shall blow H8628 , but ye shall not H3808 sound an alarm H7321 .
|
8. फकत अहरोनाच्या याजक असलेल्या मुलांनीच कर्णे वाजवावीत. तुम्हाला पिढ्यान्पिढ्याचा कायमचा विधीनियम आहे.
|
8. And the sons H1121 of Aaron H175 , the priests H3548 , shall blow H8628 with the trumpets H2689 ; and they shall be H1961 to you for an ordinance H2708 forever H5769 throughout your generations H1755 .
|
9. “जर तुम्ही तुमच्या देशातच शत्रूशी लढत असाल, तर त्यांच्याशी लढावयास जाण्यापूर्वी तुम्ही मोठमोठ्याने कर्णे वाजवावेत. परमेश्वर तुमचा कर्ण्यांचा आवाज ऐकेल आणि तो तुमच्या शत्रूपासून तुमचे रक्षण करील.
|
9. And if H3588 ye go H935 to war H4421 in your land H776 against H5921 the enemy H6862 that oppresseth H6887 you , then ye shall blow an alarm H7321 with the trumpets H2689 ; and ye shall be remembered H2142 before H6440 the LORD H3068 your God H430 , and ye shall be saved H3467 from your enemies H4480 H341 .
|
10. तसेच तुम्ही सणाच्या व इतर आनंदाच्या प्रसंगी व नवीन चंद्राच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी-तुमची होमार्पणे, शांत्यार्पणे वाहताना तुम्ही कर्णे वाजवावेत; तुमच्या परमेश्वराला तुमची आठवण करुन देण्याचा हा एक विशेष मार्गच आहे; हे तुम्ही करावे अशी मी तुम्हास आज्ञा देतो. मी तुमचा देव परमेश्वर आहे.”
|
10. Also in the day H3117 of your gladness H8057 , and in your solemn days H4150 , and in the beginnings H7218 of your months H2320 , ye shall blow H8628 with the trumpets H2689 over H5921 your burnt offerings H5930 , and over H5921 the sacrifices H2077 of your peace offerings H8002 ; that they may be H1961 to you for a memorial H2146 before H6440 your God H430 : I H589 am the LORD H3068 your God H430 .
|
11. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या विसाव्या दिवशी कराराचा कोश असलेल्या पवित्र निवास मंडपावरील ढग वर गेला.
|
11. And it came to pass H1961 on the twentieth H6242 day of the second H8145 month H2320 , in the second H8145 year H8141 , that the cloud H6051 was taken up H5927 from off H4480 H5921 the tabernacle H4908 of the testimony H5715 .
|
12. तेव्हा इस्राएल लोकांनी आपला प्रवास सुरू केला. त्यांनी सीनायचे रान सोडले आणि ढग पारानाच्या रानात थांवेपर्यंत ते प्रवासकरीत गेले.
|
12. And the children H1121 of Israel H3478 took H5265 their journeys H4550 out of the wilderness H4480 H4057 of Sinai H5514 ; and the cloud H6051 rested H7931 in the wilderness H4057 of Paran H6290 .
|
13. छावणी हलवण्याची इस्राएल लोकांची ही पहिलीच वेळ होती. परमेश्वराने त्यांना मोशेकडून दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी हे केले.
|
13. And they first H7223 took their journey H5265 according to H5921 the commandment H6310 of the LORD H3068 by the hand H3027 of Moses H4872 .
|
14. यहुदाच्या छावणीतील तीन गट पहिल्याने निघाले. त्यांच्या निशाणा मागे ते चालले. पहिला गट यहुदाच्या कुळाचा होता. अम्मीनादाबाचा मुलगा नहशोन त्यांचा सेनानायक होता.
|
14. In the first H7223 place went H5265 the standard H1714 of the camp H4264 of the children H1121 of Judah H3063 according to their armies H6635 : and over H5921 his host H6635 was Nahshon H5177 the son H1121 of Amminadab H5992 .
|
15. त्यानंतर इस्साखारचे कूळ निघाले. सुवाराचा मुलगा नथनेल त्यांचा नेता होता.
|
15. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Issachar H3485 was Nethaneel H5417 the son H1121 of Zuar H6686 .
|
16. आणि मग जबुलूनाचे कूळ निघाले. हेलोनाचा मुलगा अलीयाब त्यांचा नेता होता.
|
16. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Zebulun H2074 was Eliab H446 the son H1121 of Helon H2497 .
|
17. मग पवित्र निवास मंडप उतरविण्यात आला आणि गेर्षोन व मरारी वंशाचे लोक पवित्र निवास मंडप घेऊन निघाले. तेव्हा ह्या वंशाचे लोक नंतरच्या रांगते होते.
|
17. And the tabernacle H4908 was taken down H3381 ; and the sons H1121 of Gershon H1648 and the sons H1121 of Merari H4847 set forward H5265 , bearing H5375 the tabernacle H4908 .
|
18. त्यानंतर रऊबेन वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशानामागे चालले होते. त्यातील पहिला गट रऊबेन कुळाचा होता. शदेयुराचा मुलगा अलीसूर त्यांचा सेनानायक होता.
|
18. And the standard H1714 of the camp H4264 of Reuben H7205 set forward H5265 according to their armies H6635 : and over H5921 his host H6635 was Elizur H468 the son H1121 of Shedeur H7707 .
|
19. त्यानंतर शिमोन कुळाचे लोक निघाले. सुरीशदैचा मुलगा शलूमीयेल हा त्यांचा सेनानायक होता.
|
19. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Simeon H8095 was Shelumiel H8017 the son H1121 of Zurishaddai H6701 .
|
20. नंतर गाद वंशाच्या दलाचे लोक निघाले. रगुवेलाचा मुलगा एल्यासाप त्यांचा सेनानायक होता.
|
20. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Gad H1410 was Eliasaph H460 the son H1121 of Deuel H1845 .
|
21. मग कहाथी लोक पवित्र स्थानातील पवित्र वस्तू घेऊन निघाले. ते अशावेळी जाऊन पोहोंचले की त्यांच्या येण्याओगोदर इतर लोकांनी पवित्र निवास मंडप उभा करुन तयार ठेवला होता.
|
21. And the Kohathites H6956 set forward H5265 , bearing H5375 the sanctuary H4720 : and the other did set up H6965 H853 the tabernacle H4908 against H5704 they came H935 .
|
22. त्यानंतर एफ्राइम वंशाच्या छावणीतील तीन गट निघाले. लोक त्यांच्या निशाणामागे चालले होते. त्यात पहिला गट एफ्राइम कुळाचा होता. अम्मीहूदाचा मुलगा अलीशामा त्यांचा सेनानायक होता.
|
22. And the standard H1714 of the camp H4264 of the children H1121 of Ephraim H669 set forward H5265 according to their armies H6635 : and over H5921 his host H6635 was Elishama H476 the son H1121 of Ammihud H5989 .
|
23. त्यानंतर मनश्शे कुळाचे लोक निघाले. पदाहसुराचा मुलगा गमलीयेल त्यांचा सेनानायक होता.
|
23. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Manasseh H4519 was Gamaliel H1583 the son H1121 of Pedahzur H6301 .
|
24. मग बन्यामीन कुळाचे लोक निघाले. गिदोनीचा मुलगा अबीदान त्यांचा सेनानायक होता.
|
24. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Benjamin H1144 was Abidan H27 the son H1121 of Gideoni H1441 .
|
25. छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता.
|
25. And the standard H1714 of the camp H4264 of the children H1121 of Dan H1835 set forward H5265 , which was the rearward H622 of all H3605 the camps H4264 throughout their hosts H6635 : and over H5921 his host H6635 was Ahiezer H295 the son H1121 of Ammishaddai H5996 .
|
26. त्यानंतर आशेर कुळाचे लोक निघाले. आक्रानाचा मुलगा पगीयेल त्यांचा सेनानायक होता.
|
26. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Asher H836 was Pagiel H6295 the son H1121 of Ocran H5918 .
|
27. मग नफताली कुळाचे लोक निघाले. एनानाचा मुलगा अहीरा त्यांचा सेनानायक होता.
|
27. And over H5921 the host H6635 of the tribe H4294 of the children H1121 of Naphtali H5321 was Ahira H299 the son H1121 of Enan H5881 .
|
28. इस्राएल लोक ठिक ठिकाणाहून प्रवास करिताना ह्या क्रमाने निघत.
|
28. Thus H428 were the journeyings H4550 of the children H1121 of Israel H3478 according to their armies H6635 , when they set forward H5265 .
|
29. मोशेचा सासरा रगुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला मोशे म्हणाला, “देवाने आम्हाला वचन दिलेल्या देशात आम्ही जात आहोत. तू आमच्याबरोबर चल. आम्ही तुझ्याशी चांगले वागू; इस्राएल लोकांना उत्तम गोष्टी देण्याचे परमेश्वराने वचन दिले आहे.”
|
29. And Moses H4872 said H559 unto Hobab H2246 , the son H1121 of Raguel H7467 the Midianite H4084 , Moses H4872 ' father H2859 -in-law, We H587 are journeying H5265 unto H413 the place H4725 of which H834 the LORD H3068 said H559 , I will give H5414 it you: come H1980 thou with H854 us , and we will do thee good H3190 : for H3588 the LORD H3068 hath spoken H1696 good H2896 concerning H5921 Israel H3478 .
|
30. परंतु होबाबाने उत्तर दिले, “नाही, मी तुमच्याबरोबर येणार नाही. मला माझ्या देशात व माझ्या लोकात परत गेले पाहिजे.”
|
30. And he said H559 unto H413 him , I will not H3808 go H1980 ; but H3588 I H518 will depart H1980 to H413 mine own land H776 , and to H413 my kindred H4138 .
|
31. मग मोशे त्याला म्हणाला, “मी विनंती करितो की तू आम्हाला सोडून जाऊ नको; कारण ह्या रानाची आमच्यापेक्षा तुला अधिक माहिती आहे. तू आमचा वाटाड्या होऊ शकतोस.
|
31. And he said H559 , Leave H5800 us not H408 , I pray thee H4994 ; forasmuch H3588 H5921 H3651 as thou knowest H3045 how we are to encamp H2583 in the wilderness H4057 , and thou mayest be H1961 to us instead of eyes H5869 .
|
32. तू आमच्याबरोबर येशील तर परमेश्वर आम्हाला ज्या ज्या चांगल्या गोष्टी देईल त्यात आम्ही तुला वाटा देऊ.”
|
32. And it shall be H1961 , if H3588 thou go H1980 with H5973 us, yea , it shall be H1961 , that what H834 goodness H2896 the LORD H3068 shall do H3190 unto H5973 us , the same will we do H3190 unto thee.
|
33. मग होबाब मान्य झाला. आणि परमेश्वराच्या पर्वतापासून ते प्रवास करीत निघाले. याजकांनी परमेश्वराचा पवित्र कराराचा कोश घेतला व ते लोकांच्यापुढे चालले. मुक्कामासाठी जागा शोधताना तीन दिवस तो पवित्र कोश त्यांनी वाहिला.
|
33. And they departed H5265 from the mount H4480 H2022 of the LORD H3068 three H7969 days H3117 ' journey H1870 : and the ark H727 of the covenant H1285 of the LORD H3068 went H5265 before H6440 them in the three H7969 days H3117 ' journey H1870 , to search out H8446 a resting place H4496 for them.
|
34. प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
|
34. And the cloud H6051 of the LORD H3068 was upon H5921 them by day H3119 , when they went H5265 out of H4480 the camp H4264 .
|
35. लोक जेव्हा पवित्र कराराचा कोश उचलून मुक्काम हलवीत तेव्हा मोशे म्हणत असे,“हे परमेश्वरा, ऊठ तुझ्या शत्रूंची सर्व दिशांना पांगापांग होवो, तुझे सर्व शत्रू तुजपासून पळून जावोत.”
|
35. And it came to pass H1961 , when the ark H727 set forward H5265 , that Moses H4872 said H559 , Rise up H6965 , LORD H3068 , and let thine enemies H341 be scattered H6327 ; and let them that hate H8130 thee flee H5127 before H4480 H6440 thee.
|
36. आणि जेव्हा पवित्र कराराचा कोश त्याच्या जागी ठेवला जाई तेव्हा मोशे म्हणत असे,“हे परमेश्वरा, इस्राएलाच्या लाखो लोकांकडे परत ये.”
|
36. And when it rested H5117 , he said H559 , Return H7725 , O LORD H3068 , unto the many H7233 thousands H505 of Israel H3478 .
|