Bible Versions
Bible Books

1 Corinthians 1 (ERVMR) Easy to Read - Marathi

1 देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रषित होण्याकरिता निवडलेला, मी पौल आणि बंधु सोस्थनेस यांजकडून
2 देवाच्या सेवेला समर्पित केलल्या करिंथ येथील मंडळीस तसेच देवाने पवित्र होण्यास बोलाविलेल्या (पाचारलेल्या) येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवणऱ्या सर्व बंधूजनांस:
3 देव पिता आणि त्यांचा आपला प्रभु (येशू ख्रिस्त) यांजपासून कृपा शांति असो.
4 मी नेहमीच माझ्या देवाचे तुमच्यासाठी उपकार मानतो. कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची कृपा तुम्हांला मिळाली आहे,
5 This verse may not be a part of this translation
6 This verse may not be a part of this translation
7 तुम्ही कोणत्याही दानात कमी पडत नाही, कारण तुम्ही ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहता.
8 तो सुद्धा आपल्या प्रभु येशूच्या दिवशी शेवटपर्यंत तुम्हांस निर्दोष असे प्रस्थापित करील.
9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभु याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले होते तो देव विश्वासनीय आहे.
10 परंतु बंधूनो, प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावांमध्ये मी तुम्हांस विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी सारखेच बोलावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच विचाराने एकाच हेतूने परिपूणे व्हावे.
11 कारण क्लोअच्या घरातील माणसांकडून मला असे कळविण्यात आले की, तुमच्यात भांडणे आहेत,
12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी पेत्राचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
13 ख्रिस्त विभागला गेला आहे का? पौल वधस्तंभावर तुमच्यासाठी खिळला गेला होता का? पौलाच्या नावाने तुमचा बाप्तिस्मा, झालाय का?
14 मी देवाचे आभार मानतो की, क्रिस्प गायस यांच्याशिवाय मी कोणाचाही बाप्तिस्मा केला नाही.
15 यासाठी की कोणीही म्हणू नये की, माझ्या नावात तुमचा बाप्तिस्मा करण्यात आला.
16 स्तेफनाच्या घरच्यांचासुद्धा मी बाप्तिस्मा केला, पण उरलेल्यांविषयी म्हणाल, तर इतर कोणाचाही बाप्तिस्मा केल्याचे मला आठवत नाही.
17 कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही तर सुवार्ता सांगण्यासाठी पाठविले, ती भाषणाच्या ज्ञानाने नव्हे, तर अशासाठी की, ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे सामर्थ्य निरर्थक होऊ नये.
18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
19 कारण पवित्र शास्त्रांत असे लिहिले आहे, “शहाण्यांचे शहाणपण मी नष्ट करीन, आणि बुद्धिवंतांची बुध्दि मी बाजूला करीन.” यशया 29:14
20 ज्ञानी मनुष्य कोठे आहे? विद्वान कोठे आहे? या जगातील वाद घालणारा कोठे आहे? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले नाही का?
21 म्हणून, देवाच्या ज्ञानात असतानाही, जगाला स्वत:च्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वासणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाने निवडले.
22 कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात,
23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे.
24 परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य देवाचे ज्ञान असाही आहे.
25 तथापि ज्यांस तुम्ही देवाचा ‘मूर्खपणा’ म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा ‘दुर्बळपणा’ समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तितशाली आहे.
26 तर आता बंधुभागिनींनो, देवाने तुम्हांला केलेल्या पाचारणाबद्दल विचार करा. मानवी दृष्टिकोनातून तुमच्यातील पुष्कळसे शहाणे नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे सामर्थ्यशाली नव्हते. तुमच्यापैकी पुष्कळसे उच्च कुळातले नव्हते,
27 त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे.
28 आणि देवाने दीन, तुच्छ मानलेले, जे “नगण्य” त्यांना निवडले. यासाठी की जे “काहीतरी” आहेत त्यांना नगण्य करावे.
29 यासाठी की कोणीही देवासमोर बढाई मारु नये.
30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली खंडणी असा झाला.
31 यासाठी की शास्त्रात असे लिहिले आहे, “जो बढाई मारतो त्याने देवाविषयी बढाई मारावी.”
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×