Bible Versions
Bible Books

:

1 नंतर परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
2 इस्राएल लोकांना ही आज्ञा दे. योग्यवेळी धान्यार्पणे आणि बळी विसरता मला अर्पण करायला त्यांना सांग. अग्नी बरोबर देण्याची ती अर्पणे आहेत. त्यांचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
3 अग्नीबरोबरची अर्पणे त्यांनी परमेश्वराला दिलीच पाहिजेत. त्यांनी रोज एक वर्षाची दोन कोकरे दिली पाहिजेत. ती दोषरहित असली पाहिजेत.
4 एक कोकरू सकाळच्या वेळी आणि दुसरे संधिप्रकाशाच्या वेळी अर्पण करावे.
5 शिवाय आठ कप पीठ पाव कप हीन तेलात मिसळून केलेले धान्यार्पणही द्यावे.”
6 (ही रोजची अर्पणे देणे त्यांनी सीनाय पर्वतावर सुरु केले. ही अग्नी बरोबर दिलेली अर्पणे होती. त्यांचा सुवास परमेश्वराला प्रसन्न करीत असे.)
7 “लोकांनी धान्यार्पणाबरोबरच दिली जाणारी पेयाअर्पणेसुद्धा द्यावीत. त्यांनी एक पाव द्राक्षाचा रस प्रत्येक मेंढी बरोबर द्यावा. हे पेय वेदीवर एका पवित्र जागेवर ओतावे. ती परमेश्वराला द्यावयाची भेट आहे.
8 दुसरी मेंढी संधिप्रकाशाच्या वेळी अर्पणे करावी. ही शिजवलेली असावी हे अर्पण सकाळच्या अर्पणाप्रमाणेच द्यावे. तसेच त्याबरोबरची पेयार्पणेही करावीत. हे होमार्पण असेल. त्याचा सुवास परमेश्वराला आनंद देतो.”
9 “शब्बाथच्या वेळी तुम्ही एक वर्षाच्या दोन मेंढ्या दिल्या पाहिजेत. त्या दोषरहित असाव्यात. तुम्ही 16 कप पीठ हीन तेलात मिसळून केलेले धान्याचे अर्पण आणि पेयाचे अर्पणही दिले पाहिजे.
10 विश्रांतीच्या दिवसाचे हे खास अर्पण आहे. रोज देण्यात येणारे अर्पण आणि पेयार्पणा व्यतीरिक्त हे अर्पण आहे.”
11 “प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही परमेश्वराला खास होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाच्या सात मेंढ्या असतील. त्या मेंढ्या दोषरहित असाव्यात.
12 प्रत्येक बैलाबरोबर तुम्ही 24 कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. आणि मेंढ्याबरोबर 16 कप पीठ हीन तेलात मिसळून द्या.
13 प्रत्येक मेंढीबरोबर आठ कप पीठ हीन तेलात मिसळून अर्पण करा. ही अग्नीबरोबर द्यायची अर्पणे असतील. त्याचा सुवास परमेश्वराला आनंदित करतो.
14 तसेच प्रत्येक बैलाबरोबर 2 हिन द्राक्षारस, 1 1/2 हिन द्राक्षारस प्रत्येक मेंढ्याबरोबर आणि 1 हिन प्रत्येक कोकराबरोबर अर्पण करा. ही होमार्पणे प्रत्येक वर्षाच्या प्रत्येक महिन्याला अर्पण केली पाहिजेत.
15 प्रत्येक दिवशी करण्यात येणाऱ्या अर्पणा व्यतिरिक्त तुम्ही 1 बकरा परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. तो पापार्पण म्हणून द्यावा.
16 “परमेश्वराचा वल्हांडण महिन्याच्या 14 व्या दिवशी असेल.
17 बेखमीर भाकरीचा सण महिन्याच्या 15 व्या दिवशी सुरु होतो. हा सण सात दिवस असेल. खमीराशिवाय (यीस्ट) केलेली भाकरीच फक्त तुम्ही खाऊ शकता.
18 या सणाच्या पहिल्या दिवशी तुम्ही खास सभा बोलावली पाहिजे. त्या दिवशी तुम्ही कुठलेही काम करायचे नाही.
19 तुम्ही परमेश्वराला होमार्पणे द्याल. या अर्पणात दोन बैल, 1 मेंढा आणि 1 वर्षाची सात कोकरे असतील. ती दोषरहित असावीत.
20 This verse may not be a part of this translation
21 This verse may not be a part of this translation
22 तुम्ही एक बकराही अर्पण केला पाहिजे. तुम्हाला शुद्ध करण्यासाठी देण्यात येणारे ते पापार्पण असेल.
23 ही अर्पणे नेहमीच्या सकाळच्या अर्पणाव्यतिरिक्त करायची आहेत.
24 “त्याचबरोबर सात दिवस दररोज ही होमार्पणे आणि पेयार्पणे तुम्ही परमेश्वराला दिली पाहिजेत. त्यांच्या सुवासाने परमेश्वराला आनंद होईल. ही अर्पणे म्हणजे लोकांचे अन्न असेल. ही अर्पणे नेहमीच्या होमार्पणाव्यतिरिक्त असतील.
25 नंतर या सणाच्या सातव्या दिवशी तुम्ही एक खास सभा घ्याल. तुम्ही त्या दिवशी काहीही काम करणार नाही.
26 “पहिल्या फळाच्या हंगामाच्या सणाला (सप्ताहांचा सण) परमेश्वराला धान्यार्पणे देण्यासाठी नवीन धान्य वापरा. त्यावेळी तुम्ही एक खास सभाही बोलवा त्या दिवशी तुम्ही काहीही काम करायचे नाही.
27 तुम्ही होमार्पणे द्यावे. अग्नीबरोबर दिलेली ही अर्पणे असतील. तुम्ही दोन बैल, एक मेंढा 1 वर्षाची साकोकरे अर्पण करा. हि सर्व दोषरहित असावीत.
28 तुम्ही प्रत्येक बैलाबरोबर 24 कप पीठ तेलात मिसळून द्यावे. 16 कप पीठ मेंढ्याबरोबर
29 आठ कप पीठ प्रत्येक कोकऱ्या बरोबर द्यावे.
30 स्वत:ला शुद्ध करण्यासाठी तुम्ही एक बकरा बळी द्या.
31 रोजच्या होमार्पणाशिवाय धान्यर्पणाशिवाय तुम्ही ही अर्पणे द्या. प्राणी आणि पेय दोषरहित आहेत याची खात्री करा.
Copy Rights © 2023: biblelanguage.in; This is the Non-Profitable Bible Word analytical Website, Mainly for the Indian Languages. :: About Us .::. Contact Us
×

Alert

×