|
|
1. प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
|
1. A Prayer H8605 of Moses H4872 the man H376 of God H430 . Lord H136 , thou H859 hast been H1961 our dwelling place H4583 in all generations H1755 H1755 .
|
2. देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
|
2. Before H2962 the mountains H2022 were brought forth H3205 , or ever thou hadst formed H2342 the earth H776 and the world H8398 , even from everlasting H4480 H5769 to H5704 everlasting H5769 , thou H859 art God H410 .
|
3. तूच लोकांना या जगात आणतोस आणि तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
|
3. Thou turnest H7725 man H582 to H5704 destruction H1793 ; and sayest H559 , Return H7725 , ye children H1121 of men H120 .
|
4. तुझ्यासाठी हजारो वर्षे म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
|
4. For H3588 a thousand H505 years H8141 in thy sight H5869 are but as yesterday H3117 H865 when H3588 it is past H5674 , and as a watch H821 in the night H3915 .
|
5. तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे. सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो. आम्ही गवतासारखे आहोत.
|
5. Thou carriest them away as with a flood H2229 ; they are H1961 as a sleep H8142 : in the morning H1242 they are like grass H2682 which groweth up H2498 .
|
6. गवत सकाळी उगवते आणि संध्याकाळीते वाळते व मरणाला टेकते.
|
6. In the morning H1242 it flourisheth H6692 , and groweth up H2498 ; in the evening H6153 it is cut down H4135 , and withereth H3001 .
|
7. देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो. आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
|
7. For H3588 we are consumed H3615 by thine anger H639 , and by thy wrath H2534 are we troubled H926 .
|
8. तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे. देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
|
8. Thou hast set H7896 our iniquities H5771 before H5048 thee , our secret H5956 sins in the light H3974 of thy countenance H6440 .
|
9. तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
|
9. For H3588 all H3605 our days H3117 are passed away H6437 in thy wrath H5678 : we spend H3615 our years H8141 as H3644 a tale H1899 that is told .
|
10. आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि जरा सशक्त असलो तर 80 वर्षे. आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
|
10. The days H3117 of our years H8141 are threescore years and ten H7657 H8141 ; and if H518 by reason of strength H1369 they be fourscore H8084 years H8141 , yet is their strength H7296 labor H5999 and sorrow H205 ; for H3588 it is soon H2440 cut off H1468 , and we fly away H5774 .
|
11. देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही. परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
|
11. Who H4310 knoweth H3045 the power H5797 of thine anger H639 ? even according to thy fear H3374 , so is thy wrath H5678 .
|
12. आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
|
12. So H3651 teach H3045 us to number H4487 our days H3117 , that we may apply H935 our hearts H3824 unto wisdom H2451 .
|
13. परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
|
13. Return H7725 , O LORD H3068 , how long H5704 H4970 ? and let it repent H5162 thee concerning H5921 thy servants H5650 .
|
14. तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल. आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
|
14. O satisfy H7646 us early H1242 with thy mercy H2617 ; that we may rejoice H7442 and be glad H8055 all H3605 our days H3117 .
|
15. तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस. आता आम्हांला सुखी कर.
|
15. Make us glad H8055 according to the days H3117 wherein thou hast afflicted H6031 us, and the years H8141 wherein we have seen H7200 evil H7451 .
|
16. तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु शकतोस ते त्यांना बघू दे.
|
16. Let thy work H6467 appear H7200 unto H413 thy servants H5650 , and thy glory H1926 unto H5921 their children H1121 .
|
17. देवा, प्रभु, आमच्यावर दया कर. आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
|
17. And let the beauty H5278 of the LORD H136 our God H430 be H1961 upon H5921 us : and establish H3559 thou the work H4639 of our hands H3027 upon H5921 us; yea , the work H4639 of our hands H3027 establish H3559 thou it.
|